'Pradhan Mantri Fasal Bima Yojana' launched for Rabi Season 2026. रब्बी हंगाम 'प्रधानमंत्री पीक विमा योजना' सुरु.

‘Pradhan Mantri Fasal Bima Yojana’ launched for Rabi Season 2026. रब्बी हंगाम ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ सुरु.

Scheme

नमस्कार शेतकरी मित्रांनो, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता Rabi Season 2026 साठी पिकांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी शासनाने ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२६-२७’ लागू केली आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेची सविस्तर माहिती

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात रब्बी हंगाम २०२६ साठी ‘Pradhan Mantri Fasal Bima Yojana’ भरण्याची सुरुवात आजपासून शासनाच्या https://www.pmfby.gov.in या संकेतस्थळाद्वारे करण्यात आली असून, याही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी online रुपया भरावा लागणार आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी 1 कोटी 70 चा आसपास किंवा त्या लक्ष पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीकविमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता.

रब्बी हंगाम पिक विमा म्हणजे काय? (What is rabbi hangam pik vima?)

रबी हंगामातील पीक विमा ही एक अशी योजना आहे जी हिवाळ्यात पेरलेल्या पिकांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट किंवा कीटक आणि रोगांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण देते.

शेतकऱ्यांनी आपला खरीपाचा पीकविमा ३० नोव्हेंबर पूर्वी भरून घ्यावा

रब्बी हंगाम २०२६ साठी ‘Pradhan Mantri Fasal Bima Yojana’ साठी रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), गहू, रब्बी मका, हरभरा, रब्बी कांदा, उन्हाळी भुईमूग, उन्हाळी भात ही ७ पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. तर या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर असून, त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून घ्यावायाचा आहे.

योजनेतील वैशिष्ट : विमा योजनेत समाविष्ट  पिके रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), गहू, रब्बी मका, हरभरा, रब्बी कांदा, उन्हाळी भुईमूग, उन्हाळी भात ही ७ पिकांसाठी, शेतकऱ्यांना भाग घेता येईल. सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे.

ई-पीक पाहणी :- शेतकऱ्याने रब्बी हंगाम २०२६ साठी ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ भरण्या अगोदर शेतात लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणी मध्ये नोंद करणे आवश्यक आहे. आपल्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर प्रधानमंत्री पीक विमा काढणे, उदाहरणार्थ शासकीय जमीन, अकृषक जमीन, कंपनी, संस्था, मंदिर, मस्जिद  यांच्या जमिनीवर विमा काढल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल.

या योजनेत आपण जे पिकाची नोंद ई-पीक पाहणी मध्ये नोंद शेतात लावले आहे त्याचाच विमा घ्यावा. शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागेल. २०२६ या वर्षी  ७ पिकांसाठी, ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ चा लाभ मिळणार आहे.

Related Post: महाडीबीटी रब्बी बियाणे अनुदान योजना: अर्ज कसा करावा? सविस्तर माहिती

रब्बी हंगाम २०२६ साठी कोणकोणत्या ७ पिकांचा समावेश आहे?

  1. रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत)
  2. गहू
  3. रब्बी मका
  4. हरभरा
  5. रब्बी कांदा
  6. उन्हाळी भुईमूग
  7. उन्हाळी भात

Rabi Season 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख (डेडलाईन):

  • रब्बी ज्वारी: ३० नोव्हेंबर २०२६
  • हरभरा, मका आणि रब्बी कांदा: २५ डिसेंबर २०२६
  • उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूग: ३१ मार्च २०२७

अर्ज कसा आणि कुठे करावा?

शेतकरी स्वतः घरबसल्या मोबाईल द्वारा PMFBY पोर्टलवर किंवा ‘Crop Insurance’ ॲपच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. किंवा ज्या कोणत्याही शेतकरी बांधवाना ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर, तुमच्या जवळच्या CSC (सीएससी) आणि आपले सरकार केंद्रावर जाऊन अर्ज भरता येईल. कर्जदार शेतकरी बँकेच्या माध्यमातूनही Rabi Season 2026 साठी अर्ज करू शकतात.

कर्जदार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना:

ही योजना पूर्णपणे ऐच्छिक आहे. जर एखाद्या कर्जदार शेतकऱ्याला Rabi Season 2026 साठी या योजनेत सहभागी व्हायचे नसेल, तर अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेच्या किमान ७ दिवस आधी बँकेत लेखी Rabi Season 2026 साठी संमतीपत्र देणे अनिवार्य आहे.

रब्बी हंगाम २०२६ साठी आवश्यक कागदपत्रे:

Rabi Season 2026 साठी या योजनेसाठी अर्ज करताना ‘रब्बी पीकपेरा’ आणि ‘Farmer ID’ हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र लागणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, कोणतीही जोखीम न पत्करता वेळेत आपल्या पिकांचा विमा नक्की उतरवा. ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट नक्की शेअर करा! 

विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याने काय करावे?

रबी हंगाम २०२६ (प्रधानमंत्री पीक विमा योजना) साठी, शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम तारखेच्या किमान सात दिवस आधी, विमा हप्ता न भरल्याबद्दल संबंधित बँकेला लेखी स्वरूपात कळवणे आवश्यक आहे. जे शेतकरी कर्ज घेत नाहीत, ते आपले ७/१२ स्टेटमेंट, बँक पासबुक, आधार कार्ड आणि पीक पेरणीचे स्वयं-घोषणापत्र अधिकृत बँक, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), आपले सरकार केंद्र येथे किंवा www.pmfby.gov.in पोर्टलद्वारे सादर करून विमा योजनेत सहभागी होऊ शकतात. योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत