SBI Cyber Attack : पुणे, २२ ऑक्टोबर २०२६: देशामधील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) हजारो ग्राहकांचा वैयक्तिक डेटा डार्क वेबवर लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका सायबर घटनेनंतर (Cyber Incident) हा डेटा लीक झाल्याचा संशय असून, बँकेने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या फायलिंगमध्ये या घटनेला अधिकृतपणे दुजोरा दिला आहे.
डार्क वेबवरील सुमारे ३.७५ लाख रेकॉर्ड्सच्या प्राथमिक विश्लेषणानंतर, सध्या ३,८९७ ग्राहकांचा डेटा उघड झाल्याची माहिती समोर आली आहे
ग्राहकांची कोणती माहिती झाली लीक? (What Information is Exposed?)
प्राथमिक तपासानुसार लीक झालेल्या डेटाचा गैरवापर होण्याची शक्यता असून, यामध्ये ग्राहकांची खालील संवेदनशील माहिती (Personally Identifiable Information – PII) समाविष्ट आहे:
- नाव आणि लिंग (Names and Gender)
- बँकेकडे नोंदणीकृत असलेले मोबाईल नंबर (Registered Mobile Numbers)
- ईमेल आयडी आणि जन्मतारीख (Email Addresses & DOB)
- राहण्याचा संपूर्ण पत्ता (Residential Addresses)
‘बँकेचे कामकाज आणि ग्राहकांचे पैसे सुरक्षित’ – SBI चा खुलासा
या सायबर घटनेनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना दिलासा देणारी नोटीस जारी केली आहे [image_VjdOvA.png]. बँकेने स्पष्ट केले आहे की:
- आयटी सिस्टीमवर परिणाम नाही: या सायबर हल्ल्यामुळे बँकेच्या मुख्य आयटी सिस्टीम (IT Systems), मुख्य व्यावसायिक कामकाज (Core Operations) आणि वित्तीय कामगिरीवर कोणताही परिणाम झालेला नाही.
- पैसे पूर्णपणे सुरक्षित: सर्व ग्राहकांच्या खात्यात जमा असलेली रक्कम (Deposits) १००% सुरक्षित आहे.
- सुरक्षा उपाय कडक: बँकेने सायबर इन्सिडेंट रिस्पॉन्स प्रोटोकॉल सक्रिय केला असून, एका स्वतंत्र सायबर सुरक्षा एजन्सीमार्फत या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. ग्राहकांच्या डेटाची सुरक्षा हीच बँकेची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Bank Account Transfer Application Marathi (अर्ज कसा लिहावा?)
SBI ग्राहकांनी आता काय करावे? (Safety Tips for Customers)
तुमचा डेटा लीक झाला असो वा नसो, संभाव्य सायबर फसवणूक टाळण्यासाठी खालील गोष्टी त्वरित करा:
- पासवर्ड बदला: तुमचे इंटरनेट बँकिंग (Internet Banking) आणि योनो (Yono SBI) ॲपचे लॉगिन आणि ट्रान्झॅक्शन पासवर्ड त्वरित बदला.
- फिशिंग कॉल्सपासून सावधान: सायबर गुन्हेगार लीक झालेल्या डेटाचा वापर करून तुम्हाला SBI कर्मचारी बनून फोन करू शकतात. बँक कधीही फोनवर OTP, UPI PIN किंवा ATM पासवर्ड मागत नाही, हे लक्षात ठेवा.
- बँक स्टेटमेंट तपासा: तुमच्या खात्यातून होणाऱ्या पैशांच्या व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवा. कोणताही संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित बँकेला कळवा किंवा राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन नंबर १९३० वर तक्रार नोंदवा.
Related Post: Bank E KYC Update Online : Bank चे केवायसी घरबसल्या कसे करावे?
SBI Cyber Attack Press Note : Sbi चे हे पत्र जाहीर झालेले आहे.

