Shetkari Karjmukti Yojana 2026 SOP

Shetkari Karjmukti Yojana 2026 SOP: मयत शेतकरी व बोटांचे ठसे न येणाऱ्यांसाठी नवीन SOP जारी |

Scheme

Shetkari Karjmukti Yojana 2026 SOP, शेतकऱ्यांसाठी नवीन SOP, महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ची अंमलबजावणी वेगाने सुरू केली आहे. महाआयटी (MahaIT) मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या १६.९६ लाख पात्र लाभार्थ्यांपैकी १३.४८ लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.

परंतु, अनेक ठिकाणी वयस्कर शेतकऱ्यांचे बोटांचे ठसे (Fingerprints) जुळत नाहीत किंवा पात्र लाभार्थी शेतकरी मयत (Deceased) झाल्यामुळे कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था (महाराष्ट्र राज्य, पुणे) यांनी १९ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष मार्गदर्शक सूचना आणि मानक कार्यप्रणाली (SOP) जारी केली आहे.

जर तुमच्या कुटुंबात किंवा गावात असा प्रश्न असेल, तर Shetkari Karjmukti Yojana 2026 SOP हा लेख आणि शासकीय प्रक्रिया शेवटपर्यंत नक्की वाचा.

१) वयस्कर व बोटांचे ठसे न येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काय आहे प्रक्रिया?

ज्या वयस्कर शेतकऱ्यांचे हाताचे ठसे झिजल्यामुळे आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) होत नाही, त्यांच्यासाठी Shetkari Karjmukti Yojana 2026 SOP खालीलप्रमाणे ४ पायऱ्यांची प्रक्रिया ठरवून देण्यात आली आहे:

  1. आपले सरकार सेवा केंद्रास भेट: शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात (ASSK) जाऊन यादीतील विशिष्ट क्रमांक आणि आधार कार्ड व बँक पासबुक सोबत न्यावे.
  2. तीन वेळा प्रयत्न: केंद्र चालकाने वेगवेगळ्या बोटांचे ठसे घेऊन किमान ३ वेळा प्रमाणीकरणाचा प्रयत्न करणे बंधनकारक आहे.
  3. ‘Unable to Authenticate’ पर्याय: ३ वेळा प्रयत्न करूनही ठसे न जुळल्यास पोर्टलवर “प्रमाणीकरण शक्य नाही” (Unable to Authenticate) हा पर्याय निवडला जाईल.
  4. चालकाचे प्रमाणीकरण व TLC कडे तक्रार: यानंतर केंद्र चालक स्वतःच्या बोटांच्या ठशाने आधार प्रमाणीकरण करेल. हा अर्ज लगेच तालुकास्तरीय समितीकडे (TLC) वर्ग होईल.

तहसीलदार कार्यालयात ओळख पडताळणी:

तक्रार TLC कडे गेल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने आपले आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि ७/१२ उतारा घेऊन तहसील कार्यालयात स्वतःची ओळख निश्चित करावी. तालुकास्तरीय समिती (TLC) कागदपत्रांची छाननी करून तक्रार मान्य करेल आणि आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम थेट खात्यावर जमा होईल.

२) मयत (मृत) शेतकऱ्यांच्या कर्जखात्यासाठी वारस नोंद SOP

जर पात्र लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल, तर त्यांच्या वारसांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी बँकांसाठी पुढील Shetkari Karjmukti Yojana 2026 SOP लागू करण्यात आली आहे:

  • बँकेकडे वारस नोंद करणे: मयत शेतकऱ्याच्या वारसाने संबंधित बँकेत जाऊन प्रचलित धोरणानुसार वारस नोंद (Nomination/Legal Heir) पूर्ण करावी.
  • Upload Deceased Accounts सुविधा: बँकेद्वारे कर्जखात्यास वारसाची नोंद झाल्यावर योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ‘Upload Deceased Accounts’ या सुविधेद्वारे वारसाची माहिती अपलोड केली जाईल.
  • आवश्यक माहिती व कागदपत्रे: यामध्ये वारसाचे नाव, आधार क्रमांक, जन्मतारीख, मोबाईल नंबर, शेती आयडी (Farmer ID/Agri Stack Registry), बचत खाते क्रमांक, PACS माहिती आणि कर्ज खात्यातील हिश्श्याची टक्केवारी अपलोड करावी लागेल.
  • शासकीय लेखापरीक्षक तपासणी: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCCB) बाबतीत संबंधित शासकीय लेखापरीक्षकांमार्फत कर्जखात्यांची तपासणी केली जाईल.
  • अनेक वारस असल्यास: एकापेक्षा जास्त कायदेशीर वारस असल्यास कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात वर्ग केली जाईल. वारस नसल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.

मयत शेतकरी, Shetkari Karjmukti Yojana 2026 SOP GR PDF 1

वयस्कर शेतकरी, Shetkari Karjmukti Yojana 2026 SOP GR PDF 2

📄 आवश्यक कागदपत्रांची यादी (Shetkari Karjmukti Yojana 2026 SOP Checklist)

अ.क्र.वयस्कर शेतकरी प्रमाणीकरणासाठीमयत शेतकरी वारस नोंदीसाठी
आधार कार्डमयत शेतकऱ्याचा मृत्यू दाखला
बँक पासबुकवारसांचे आधार कार्ड व फोटो
७/१२ व ८-अ उताराकायदेशीर वारस दाखला / शपथपत्र
विशिष्ट क्रमांक (List Sr. No.)बँक पासबुक (वारसाचे) व ७/१२

संबंधित लेख वाचा : CM Ladki Bahin Yojana Maharashtra , मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

Shetkari Karjmukti Yojana 2026 SOP GR
Shetkari Karjmukti Yojana 2026 SOP GR

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

प्र. १) बायोमेट्रिक किंवा बोटांचे ठसे न आल्यास कर्जमुक्ती रद्द होईल का?

उत्तर: नाही, कर्जमुक्ती रद्द होणार नाही. ३ वेळा प्रयत्न असफल झाल्यास ‘Unable to Authenticate’ पर्याय वापरून तालुकास्तरीय समिती (TLC) द्वारे तहसील कार्यालयातून प्रत्यक्ष ओळख पटवून लाभ दिला जाईल.

प्र. २) मयत शेतकऱ्याच्या वारसांना कर्जमुक्तीचा लाभ कधी मिळणार?

उत्तर: बँकेत वारस नोंद पूर्ण झाल्यानंतर बँक ‘Upload Deceased Accounts’ पोर्टलवर माहिती अपडेट करेल. महाआयटी मार्फत छाननी होऊन नवीन यादी प्रसिद्ध झाल्यावर लाभ खात्यावर जमा होईल.

प्र. ३) मयत शेतकऱ्याचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे का?

उत्तर: नाही. मयत शेतकऱ्याच्या बाबतीत वारसाची नोंद करून वारसाचे आधार प्रमाणीकरण किंवा Farmer ID/Agri Stack Registry द्वारे नोंद पूर्ण केली जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत