शिरपूर हादरले! पारशीपाड्यात ५ मिनिटांत संसार खाक; लग्नकार्यात नाचणारा घोडा आगीत जिवंत जळाला

By Shailesh Pawara

Published On:

Date:

शिरपूर हादरले! पारशीपाड्यात ५ मिनिटांत संसार खाक; लग्नकार्यात नाचणारा घोडा आगीत जिवंत जळाला

शिरपूर हादरले! : शिरपूर तालुक्यातील पारशीपाडा येथे भीषण आगीची घटना घडली आहे. अवघ्या ५ मिनिटांत आगीने रौद्ररूप धारण केल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून मुक्या प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर…

शिरपूर हादरले! पारशीपाड्यात ५ मिनिटांत संसार खाक

शिरपूर: तालुक्यातील पारशीपाडा येथे १२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास भीषण अग्निकांड घडले. राजू तुळशिराम पावरा यांच्या लाकडी घराला अचानक आग लागली आणि पाहता पाहता अवघ्या ५ मिनिटांत संपूर्ण घर जळून खाक झाले. या आगीत संसारोपयोगी साहित्यासह पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे.

मुक्या प्राण्यांचा दुर्दैवी अंत:

या आगीची भीषणता इतकी मोठी होती की, घरात बांधलेला लग्नकार्यात नाचणारा घोडा आणि एक गाय यांना बाहेर काढण्याची संधीही मिळाली नाही; त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तसेच १ म्हैस, १ वासरू आणि १ गाय गंभीररीत्या भाजली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लाखोंचे नुकसान:

प्राथमिक अंदाजानुसार, या आगीत लाकूड, पीव्हीसी पाईप, ठिबक नळी संच आणि घरातील धान्य असे मिळून सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

मदत आणि सांत्वन:

घटनेची माहिती मिळताच लोकनियुक्त सरपंच प्रतिनिधी (जोयदा) तथा बिरसा आर्मीचे राज्याध्यक्ष मनोज पावरा यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पीडित कुटुंबाचे सांत्वन करून

सरकारी मदत मिळवून देण्यासाठी आणि पंचनामा करण्याबाबत प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी सरपंच दिलीप पावरा व ग्रामस्थ उपस्थित होते.

शिरपूर हादरले! पारशीपाड्यात ५ मिनिटांत संसार खाक; लग्नकार्यात नाचणारा घोडा आगीत जिवंत जळाला

News वाचायचे असल्यास आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.

Related News

WordPress Market Furnitor – Minimalism Furniture Store WordPress Theme Furnityn – Interior Design Elementor Kit Template Fury – Angular 16+ Material Design Admin Template Fusion | Portfolio WordPress Theme Futura – Insurance Elementor Template Kit Future – AI Agency & Technology WordPress Theme FX Movers – Moving & Storage Company Elementor Template Kit Gabo – Minimalist & Full-Screen WordPress theme Gabriela – Crafted Blog WordPress Theme Gaco – Landscape & Gardening Elementor Template Kit