Breaking News: Shirpur police nab temple thieves!

Breaking News :शिरपूर पोलिसांनी मंदिर चोरांच्या मुसक्या आवळल्या!

Breaking News

Breaking News: Shirpur police nab temple thieves! शिरपूर पोलिसांची मोठी कामगिरी! मंदिर चोरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील दोघांना अटक; 4 किलो 199 ग्रॅम चांदी जप्त, मंदिर चोरांच्या मुसक्या आवळल्या! शिरपूर पोलिसांनी 6 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले

धुळे ते नाशिक मंदिर चोरीचे कनेक्शन उघड! दोघे आरोपी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत, सीसीटीव्हीच्या आधारे मंदिर चोरांचा शोध; शिरपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई 4.199 किलो चांदीसह 7.83 लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

Breaking News: Shirpur police nab temple thieves! सविस्तर बातमी

शिरपूर शहर पोलिसांनी मंदिर चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत मध्य प्रदेशातील दोन आरोपींना अटक करून तब्बल 4 किलो 199 ग्रॅम वजनाची चांदीची आभूषणे आणि रोख रक्कम असा एकूण 7 लाख 83 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे धुळे व नाशिक जिल्ह्यातील मंदिर चोरीचे एकूण 6 गुन्हे उघडकीस आले आहेत.

दि. 30 जून 2026 रोजी रात्री 9 वाजेपासून 1 जुलै रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान सावळदे, ता. शिरपूर येथील दत्त मंदिरातील दानपेटी फोडून अंदाजे 22 ते 25 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाला वेग दिला. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, गोपनीय बातमीदार सक्रिय करण्यात आले आणि विविध दिशांनी तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांना आरोपी मध्य प्रदेशातील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मध्य प्रदेशातील संवेदनशील भागात शोध घेत सदीम गिलदार देवका (वय 27) आणि भिकला रामसिंग देवका (वय 39) या दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी सावळदे येथील दत्त मंदिरातील चोरीची कबुली दिली. पुढील पोलीस कोठडीतील तपासात त्यांनी शिरपूर शहरातील एका घरात, सावळद परिसरातील झोपडीत तसेच धुळे, मालेगाव आणि सटाणा परिसरातील मंदिरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपींकडून 1,131 ग्रॅम चांदीचा घडा, 820 ग्रॅम वजनाचे चांदीचे घोडे, 1,269 ग्रॅम वजनाचे 5 चांदीचे मुकुट, 601 ग्रॅम वजनाच्या 3 चांदीच्या पाटल्या, 351 ग्रॅम वजनाचे चांदीचे कडे, जोडवे, ब्रेसलेट, चैन, हार, छत्री-व नाग आदी आभूषणे, तसेच रोख रक्कम आणि चोरीसाठी वापरलेली लोखंडी हत्यारे व साहित्य हस्तगत करण्यात आले.

या कारवाईत शिरपूर शहर, धुळे तालुका, मालेगाव आणि सटाणा पोलीस ठाण्यांत दाखल असलेले मंदिर चोरी व घरफोडीचे एकूण 6 गुन्हे उघडकीस आले आहेत. विशेषतः धुळे येथील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील श्रीराम मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

हे देखील वाचा : Police complaint Format in Marathi, तक्रार अर्ज पोलीस स्टेशन

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोउनि. जितेंद्र महाजन तसेच शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली.

शिरपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे मंदिर चोरीच्या घटनांमागील आरोपींचा छडा लागला असून, मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल परत मिळवण्यात यश आले आहे. Breaking News: Shirpur police nab temple thieves!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत