धुळे, Kanyadan Yojana दि. 29 जुलै, 2026 : भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) तसेच विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल जोडप्यांसाठी शासनामार्फत कन्यादान योजना राबविण्यात येत असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित स्वयंसेवी संस्था, समाजसेवी संघटना तसेच पात्र लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सुभाष फंड यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
Kanyadan Yojana
या योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक पात्र जोडप्यास शासनामार्फत रु. 25 हजारांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला प्रत्येक पात्र जोडप्यामागे रु. 4 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते.
कन्यादान योजनेचे अटी व शर्तीं
सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यास इच्छुक स्वयंसेवी संस्था तसेच पात्र लाभार्थ्यांनी शासनाने निर्धारित केलेल्या अटी व शर्तींनुसार आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत.
हे देखील वाचा : कन्यादान योजनेसाठी अर्ज PDF
Kanyadan Yojana Apply Office
अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, धुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, साक्री रोड, धुळे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.