Maharashtra Cast Certificate, Documents, Apply Process महाराष्ट्र जात प्रमाणपत्र: कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या, प्रतिमा ai द्वारे निर्मित

Maharashtra Cast Certificate, Documents, Apply Process महाराष्ट्र जात प्रमाणपत्र: कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

Marathi Arj

Maharashtra Cast Certificate, Documents, Apply Process :महाराष्ट्रामध्ये जात प्रमाणपत्राला अधिकृतपणे आरक्षित वर्गातील ‘अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), मागासवर्गीय, VJNT, SBC साठी दिले जाते. हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ), तहसीलदार यांची स्वाक्षरी द्वारे जारी केले जाते. चला तर मग महाराष्ट्र जात प्रमाणपत्र: कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

का दिले जाते, जात प्रमाणपत्र दिले? (उद्देश आणि महत्त्व)

जात प्रमाणपत्र हे आरक्षित वर्गातील ‘अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), मागासवर्गीय, VJNT, SBC साठी दिले जाते. जात प्रमाणपत्र अधिकृत पुरावा म्हणून दिले जाते. शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती आणि फी माफी, शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण, राजकीय प्रतिनिधित्व, शासकीय योजना आणि सबसिडी साठी दिले जाते. तसेच शैक्षणिक किंवा शासकीय नोकरी, रोजगाराच्या उद्देशांसाठी, जात प्रमाणपत्रासोबत ‘जात वैधता प्रमाणपत्र’ मिळवणे आवश्यक आहे.

पात्रतेचे निकष

महाराष्ट्रात जात प्रमाणपत्रासाठी पात्र होण्याकरिता, (Maharashtra Cast Certificate, Documents, Apply Process) खालील सर्व अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

महाराष्ट्राचे मूळ आणि कायमचे रहिवासी ‘अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), मागासवर्गीय, VJNT, SBC प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारच्या नियमांनुसार, अर्जदाराच्या पूर्वजांची नाव संबंधित प्रवर्गात सामील झाल्याच्या तारखेपासून महाराष्ट्रात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

प्रवर्ग (Category)आवश्यक तारीख
अनुसूचित जाती (SC)१३ ऑक्टोबर १९५० किंवा त्यापूर्वी
अनुसूचित जमाती (ST)६ सप्टेंबर १९५० किंवा त्यापूर्वी
विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT)२१ नोव्हेंबर १९६१ किंवा त्यापूर्वी
इतर मागासवर्ग (OBC)१३ ऑक्टोबर १९६७ किंवा त्यापूर्वी
विशेष मागास प्रवर्ग (SBC)१३ ऑक्टोबर १९६७ किंवा त्यापूर्वी

आवश्यक मूलभूत कागदपत्रे (Required Documents)

आरक्षित वर्गातील ‘अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), मागासवर्गीय, VJNT, SBC साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे पहा.

अ. अर्जदाराची कागदपत्रे (महत्त्वाचे ओरीजनल पुरावे)

  • ओळखीचा पुरावा म्हणून फक्त एकच पुरावा वापरला जातो: आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स
  • पत्ताचा पुरावा म्हणून फक्त एकच पुरावा वापरला जातो: रेशन कार्ड / वीज बिल
  • वय आणि शिक्षणाचा पुरावा: जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याच्या दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र
  • फोटो: एक पासपोर्ट आकाराचा फोटो.

ब. पूर्वजांचे व रक्ताच्या नात्यातील पुरावे (महत्त्वाचे ओरीजनल पुरावे)

  • वडीलांचा पुरावा: जन्म दाखला किंवा वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला (ज्यावर जातीची नोंद असेल असा एक पुरावा)
  • आजोबा/पणजोबांचा पुरावा: जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला, जन्म-मृत्यूची नोंद, किंवा जुना ७/१२ उतारा / महसुली नोंद (ज्यावर तारखेपूर्वीची नोंद असेल १९५० पूर्वीचा कोणाचाही एक ओरीजनल दाखला)
  • रक्ताच्या नात्यातील दाखला: काका, सख्खा भाऊ/बहीण, वडील किंवा आजोबा यांचे जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला, जन्म-मृत्यूची नोंद, आधी काढलेले जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र (Validity) असल्यास ते जोडल्यास अर्ज लवकर मंजूर होतो. आणि यातील १९५० पूर्वीचा कोणाचाही एक पुरावा.

क. प्रतिज्ञापत्र व अर्ज

  • स्वयंघोषणा पत्र : ‘आपले सरकार’ पोर्टल्सवर उपलब्ध असलेला नमुना अर्ज.
  • नमुना १ : विहित नमुन्यातील नमुना १ अर्ज.

ऑनलाईन अर्ज कसा करावा? : Apply Process

पोर्टलवर नोंदणी करा (Registration)

‘आपले सरकार’ च्या अधिकृत वेबसाईटवर (aaplesarkar.mahaonline.gov.in) जा.
‘New User? Register Here’ या पर्यायावर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर, नाव आणि पासवर्ड टाकून नवीन प्रोफाईल / खाते तयार करा.

लॉग इन करून सेवा निवडा :महसूल विभाग / महसूल सेवा.

  • पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर ‘Revenue Department’ (महसूल विभाग) निवडा.
  • त्यातील ‘Cast Certificate’ (जात प्रमाणपत्र) या पर्यायावर क्लिक करा.

अर्ज भरा :

अर्जदाराची वैयक्तिक माहिती, पत्ता, आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती अचूक भरा.तुमची जात (Caste) आणि प्रवर्ग (Category – SC/ST/OBC/VJNT/SBC) अचूक निवडा.

कागदपत्रे अपलोड करा :

विचारलेली सर्व कागदपत्रे (ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, वडीलांचा/पूर्वजांचा दाखला) स्कॅन करून PDF किंवा JPEG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
पासपोर्ट साईज फोटो आणि सही/अंगठ्याचा ठसा अपलोड करा.

शुल्क भरा व सबमिट करा :

सुमारे ₹६९ सरकारी फी.ऑनलाईन पद्धतीचा (UPI / Debit Card / Net Banking) वापर करून आवश्यक ते सरकारी शुल्क (Fee) भरा.
अर्ज Submit करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक Application No. (अर्ज क्रमांक) आणि पावती (Acknowledgment Receipt) मिळेल.

महाराष्ट्रातील प्रमाणपत्र जारी करणारे प्राधिकरण

महाराष्ट्राने जात प्रमाणपत्र जारी करणारे प्राधिकरण बदलले आहे. पूर्वी जातीचा दाखल्यावर सही शिक्का हा हाताने मारून दिला जात होता.-केंद्रित प्रक्रिया बदलून, आता ही जात प्रमाणपत्रे अतिरिक्त उपायुक्त (महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ), तहसीलदार यांची डिजिटल स्वाक्षरी द्वारे यांच्यामार्फत जारी केली जातात.

महाराष्ट्रामध्ये जात प्रमाणपत्राची वैधता

जात प्रमाणपत्र ची वैधता हि ऑनलाईन काढून घेतल्यापासून कायमस्वरूपी असते. आवश्यक सर्व ओरीजनल कागदपत्रे हे तपशिलासह नव्याने अर्ज करू इस्च्छित असाल तर नूतनीकरण करणेची आवश्यक नाही. ओरीजनल कागदपत्रे हे शाळा सोडल्याचे दाखले (TC), महसुली नोंदी (खाते उतारा 7/12), जन्म-मृत्यू जुनी नोंद किंवा जुनी खरेदी खताचेची कागदपत्रे पुरावा म्हणून जातीचा दाखल्यासाठी स्वीकारली जातात.

हे देखील वाचा : महाडीबीटी २.० पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू.

डिजिटल स्वाक्षरी असलेली PDF सेव्ह करण्यासाठी ‘Download Cast Certificate’ वर क्लिक करा.

Cast Certificate PDF Download असेल तर आपण आपल्या मोबाईल मध्ये DigiLocker मध्ये सेव करू शकता आणि महत्वाचे म्हणजे डिजिटल स्वाक्षरी हि (Citizen Resource Information Officer) डिजिटल स्वाक्षरी असते कायदेशीररित्या वैध आहेत. जर तुमचा मोबाईल नं. आधार लिंक केलेला असेल, तर ती DigiLocker द्वारे देखील Cast Certificate PDF मिळवता येतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

महाराष्ट्रामध्ये जात प्रमाणपत्रासाठी कोणते पोर्टल वापरले जाते?

महाराष्ट्रामध्ये जात प्रमाणपत्रासाठी aaplesarkar.mahaonline.gov.in वर सरळ महाराष्ट्र पोर्टलद्वारे अर्ज केला जातो. हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत एकात्मिक सेवा पोर्टल आहे.

महाराष्ट्रामध्ये जात प्रमाणपत्र कोण जारी करते?

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ), तहसीलदार यांची स्वाक्षरी द्वारे जरी केले जाते.

महाराष्ट्रामध्ये जात प्रमाणपत्र मिळायला किती वेळ लागतो?

महाराष्ट्रामध्ये जात प्रमाणपत्र 15 ते 20 दिवसांत मिळतो, तर त्याची ऑनलाईन फी हि ६९ रु आहे.

कृपया तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये मांडा.

मला आशा आहे की तुम्हाला, Maharashtra Cast Certificate, Documents, Apply Process वरील हा लेख आवडला असेल आणि अजूनही काही प्रश्न असल्यास, कृपया खाली कमेंट करा. मी शक्य तितक्या लवकर तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन.

जर ‘Maharashtra Cast Certificate, Documents, Apply Process ‘ हा लेख तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकाला उपयुक्त ठरू शकत असेल, तर कृपया Maharashtra Cast Certificate, Documents, Apply Process तो त्यांच्यासोबत फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर शेअर करा. धन्यवाद!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत