Poster listing 27 internship opportunities under PM Internship Yojana with illustrations of young professionals and cityscape

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत २७ इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध

Job

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांमध्ये २७ इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 27 internship opportunities available under PM Internship Yojana

जळगाव, ६ ऑगस्ट (Gramin Batmya): भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीत, जळगाव जिल्ह्यातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये उमेदवारांना एकूण २७ इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने पात्र उमेदवारांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

PM Internship Yojana Anudan

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिपची संधी दिली जाईल आणि त्यांना दरमहा ९,००० रुपयांचे विद्यावेतन दिले जाईल. याव्यतिरिक्त, इंटर्नशिपमध्ये सामील झाल्यावर ६,००० रुपयांचे अनुदान दिले जाईल.

PM Internship Yojana Company

सध्या, जळगाव जिल्ह्यात पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड, बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेड, एचडीएफसी बँक आणि मॅरिको लिमिटेड यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. दहावी, डिप्लोमा आणि पदवीधर पात्रता असलेले उमेदवार पात्र आहेत.

हे देखील वाचा : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, ऑनलाइन अर्जाची संपूर्ण माहिती.

PM Internship Yojana Apply Website

या योजनेचा लाभ घेण्यासाठी, उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या वेबसाइटवर अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव येथे संपर्क साधा किंवा 0257-2959790 या क्रमांकावर फोन करा. तसेच, जळगावमधील जी.एस. मैदानाजवळ असलेल्या शासकीय तांत्रिक शाळेच्या जागेला भेट द्या, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संदीप ज्ञान गायकवाड यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत