Dak Jivan Vima Yojana : दि. 8 : नांदेड डाक विभागाच्या वतीने डाक जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (आरपीएलआय) योजनेंतर्गत थेट विमा प्रतिनिधी (विमा सल्लागार) म्हणून नियुक्तीसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून दि. 30 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत अधीक्षक डाकघर कार्यालय, नांदेड विभाग, नांदेड येथे स्वखर्चाने थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अर्ज अधीक्षक डाकघर कार्यालय, नांदेड विभाग येथे उपलब्ध आहेत.
Dak Jivan Vima Yojana पात्रता
उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी किमान 18 वर्षे असावे. तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त मंडळाची इयत्ता 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बेरोजगार व स्वयंरोजगार व्यक्ती, माजी विमा सल्लागार, विमा कंपन्यांचे माजी विमा प्रतिनिधी, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्रामप्रधान, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटांच्या सदस्यांसह पात्र व्यक्ती अर्ज करू शकतात.
हे देखील वाचः महात्मा फुले जनआरोग्य योजना ₹५ लाख पर्यंत मोफत उपचार मिळेल, लाभ कसा घ्यायचा ते जाणून घ्या.
Dak Jivan Vima Yojana साठी मुलाखत
उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल. यामध्ये व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्त्व, जीवन विम्याचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान आणि स्थानिक परिसराची माहिती आदी बाबींची पडताळणी करण्यात येईल.
हे देखील वाचा: पोस्ट ऑफिसची ५००रु. ची भन्नाट योजना! Antyodaya Shramik Suraksha Yojana मधून मिळवा १० लाखांपर्यंतचा विमा आणि बरेच काही
Dak Jivan Vima Yojana परवाना
निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपये सुरक्षा ठेव म्हणून राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) किंवा किसान विकास पत्र (केव्हीपी) स्वरूपात जमा करावी लागेल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरता परवाना देण्यात येईल. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाची परवाना परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर हा परवाना कायमस्वरूपी करण्यात येईल.
Dak Jivan Vima Yojana साठी लागणारे कागदपत्रे
सदर परीक्षा तीन वर्षांच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. नियुक्ती ही परवाना व कमिशन तत्त्वावर राहणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस येताना बायोडाटा, मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे अथवा अनुभव प्रमाणपत्र आणि दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे सोबत आणावीत, असे आवाहन अधीक्षक डाकघर, नांदेड विभाग यांनी केले आहे.