Lost Article Report Marathi

Lost Article Report Marathi: पोलीस स्टेशन अर्ज कसा लिहावा?

Home Marathi Arj

जर तुमची महत्वाची कोणतीही वस्तू किंवा महत्वाची ओळखपत्र, शौक्षणिक कागदपत्रे हरवले असेल, तर पोलीस ठाण्यात Lost Article Report Marathi अर्ज कसा करावा? आणि online किंवा Offline पोलीस पावती कशी मिळवावी, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देत आहे.

Lost Article Report: पोलीस स्टेशन अर्ज कसा लिहावा?

दैनंदिन धावपळीत मोबाईल, पाकीट, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना (Driving License) किंवा पासपोर्ट यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होणे ही एक सामान्य बाब आहे. परंतु, ही कागदपत्रे हरवल्यानंतर नवीन कागदपत्रे काढण्यासाठी किंवा नवीन सिम कार्ड (SIM Card) खरेदी करण्यासाठी पोलिसांची पावती (Loss Intimation Report) असणे अत्यंत आवश्यक असते.

गहाळ वस्तूंची तक्रार (Lost Article Report) का आवश्यक आहे?

कोणतीही महत्त्वाची वस्तू किंवा कागदपत्र गहाळ झाल्यास त्याची नोंद पोलिसांकडे असणे खालील कारणांसाठी गरजेचे असते:

  • गैरवापर टाळण्यासाठी: तुमच्या हरवलेल्या ओळखपत्राचा (उदा. आधार कार्ड किंवा पॅन कार्ड) वापर करून कोणी गैरव्यवहार करू नये.
  • नवीन कागदपत्रे मिळवण्यासाठी: नवीन ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा पॅन कार्ड री-प्रिंट करण्यासाठी पोलीस पावती मागितली जाते.
  • नवीन सिम कार्डसाठी: हरवलेल्या मोबाईल नंबरचे नवीन सिम कार्ड मिळवण्यासाठी टेलिकॉम कंपन्या Loss Intimation Report ची मागणी करतात.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती

अर्ज भरण्यापूर्वी खालील माहिती जवळ ठेवा:

  1. वैयक्तिक माहिती: नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि राहण्याचा पत्ता.
  2. गहाळ झालेल्या वस्तूचा तपशील: वस्तू गहाळ झाल्याची तारीख, वेळ आणि संभाव्य ठिकाण.
  3. वस्तूची माहिती:
    • मोबाईल असल्यास: IMEI नंबर आणि मोबाईल नंबर.
    • वाहनाची कागदपत्रे असल्यास: वाहन नोंदणी क्रमांक (Vehicle Number).
    • ओळखपत्र असल्यास: संबंधित ओळखपत्राचे नाव.

गहाळ वस्तू किंवा कागदपत्रे नोंदवण्यासाठी लेखी अर्ज (Lost Article Report Format)

दिनांक: [अर्ज देण्याची तारीख]

प्रति,

मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक,

[पोलीस ठाणे सांगवी ],

[शिरपूर जिल्हा धुळे]

विषय: माझे महत्त्वाची कागदपत्रे / मोबाईल / वस्तू गहाळ झाल्याची नोंद करण्याबाबत.

महोदय/महोदया,

मी, [शैलेश लालसिंग], वय [२९ ] वर्षे, राहणार [न्यू बोराडी पोस्ट बोराडी येथील कायमस्वरूपी रहिवासी आहे.

मी या अर्जाद्वारे आपणास नम्रपणे कळवू इच्छितो/इच्छिते की, दिनांक [20/06/2025] रोजी [वेळ, उदा. दुपारी 2:40 वाजता] च्या सुमारास मी [shirpur Bus Stand वर होता किंवा नाशिक येथे प्रवास करत होतो, प्रवास करत असताना] माझी काही महत्त्वाची शाकीय आणि शौक्षणिक कागदपत्रे आणि वस्तू (पैसे किंवा पाकीट/मोबाईल) गहाळ झाली आहेत. मी आजूबाजूला CCTV Camera आणि सर्व संभाव्य ठिकाणी खूप शोध घेतला, परंतु ती वस्तू मला अद्याप सापडलेली नाही.

गहाळ झालेल्या वस्तूंचा / कागदपत्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

१. [उदा. आधार कार्ड – नाव: shailesh lalasing pawara ]

२. [उदा. पॅन कार्ड – नाव: shailesh alalsing pawara ]

३. [उदा. मोबाईल – Apple कंपनीचे MObile, पांढरा रंग. (मोबाईल क्रमांक: 78452659959, IMEI क्रमांक:NBhsfioh6416)]

४. [पाकीट असल्यास – पाकिटाचा पांढरा रंग व त्यातील 15000 रुपये रक्कम]

भविष्यात मला या हरवलेल्या सर्व शासकीय आणि शौक्षणिक कागदपत्रांचा किंवा Appl मोबाईलचा अज्ञात व्यक्तीकडून कोणताही गैरवापर होऊ नये म्हणून मी ही पूर्वकल्पना देत आहे. तसेच, मला माझे सर्व नवीन ओळखपत्रे / डुप्लिकेट कागदपत्रे / नवीन सिम कार्ड काढता यावे, यासाठी या घटनेची पोलीस दप्तरी नोंद (Loss Intimation) होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मी करीत आहे.

तरी कृपया माझ्या या लेखी अर्जाचा स्वीकार करून सदर घटनेची नोंद आपल्या पोलीस ठाण्यात दप्तरी घ्यावी आणि पुढील कार्यवाहीसाठी मला पोलीस तक्रारीची अधिकृत पावती जि असेल ती प्रत (N.C. / Loss Intimation Report) मिळावी, ही नम्र विनंती.

धन्यवाद!

सोबत जोडलेली कागदपत्रे:

१. ओळखीचा पुरावा (उदा. आधार कार्ड / Pan Card/ मतदान कार्डाची झेरॉक्स – उपलब्ध असल्यास)

२. मोबाईल हरवला असल्यास बॉक्स किंवा बिलाची झेरॉक्स (असल्यास)

आपला/आपली नम्र,

  • (तुमची सही)
  • नाव: [Shailesh Lalsing Pawara]
  • पत्ता: [New BOradi]
  • मोबाईल क्र.: [78459624556]
  • ई-मेल आयडी: [SHailesh pawara000@shaileshpawara]

तुम्ही Lost Article Report अर्जाच्या खाली एक टीप लिहू शकता:

“टीप: हा लेखी विनंती अर्ज एका कोऱ्या साध्या कागदावर (A4 Size) स्वच्छ अक्षरात लिहून किंवा आपल्या आवडीने टाईप करून तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करा. अर्जाची एक झेरॉक्स प्रत (Copy) स्वतःजवळ ठेवा आणि त्यावर पोलिसांचा शिक्का व सही (Received Copy) नक्की घ्या.”

हे देखील वाचा : Police complaint Format in Marathi, तक्रार अर्ज पोलीस स्टेशन

ऑनलाईन Lost Article Report Application कसा करावा?

महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत पोर्टलवरून किंवा संबंधित पोलीस आयुक्तालयाच्या वेबसाइटवरून तुम्ही ही तक्रार ऑनलाईन नोंदवू शकता:

  1. अधिकृत पोर्टलला भेट द्या: तुमच्या क्षेत्रातील पोलीस विभागाच्या (उदा. Maharashtra Police Portal / Citizen Portal) अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. Lost / Missing Article विभागात जा: होमपेजवर असलेल्या ‘Lost and Found’ किंवा ‘Lost Article Intimation’ या पर्यायावर क्लिक करा.
  3. माहिती भरा: अर्जात विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती आणि वस्तू गहाळ झाल्याचे ठिकाण अचूक भरा.
  4. OTP पडताळणी: तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करून प्राप्त झालेला OTP टाकून पडताळणी (Verification) पूर्ण करा.
  5. अर्ज सादर करा (Submit): सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा.
  6. पावती डाउनलोड करा: अर्ज सबमिट झाल्यानंतर स्क्रीनवर Loss Intimation Report जनरेट होईल. ही डिजिटल स्वाक्षरी केलेली पावती लगेच डाउनलोड करून तिची प्रिंट काढून घ्या.

Lost Article Report Application PDF

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1. ऑनलाईन नोंदवलेली Lost Article Report ही अधिकृत तक्रार (FIR) असते का?

उत्तर: नाही. ही केवळ वस्तू गहाळ झाल्याची पोलीस दप्तरी केलेली नोंद (Intimation) असते. हा FIR (First Information Report) नसतो.

Q2. ऑनलाईन Lost Article Report अर्जासाठी काही शुल्क द्यावे लागते का?

उत्तर: नाही, Lost Article Report ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

Q3. ऑनलाईन पावती मिळाल्यानंतर पोलीस ठाण्यात जाण्याची गरज असते का?

उत्तर: सामान्यतः कागदपत्रे किंवा मोबाईल गहाळ झाल्यास या डिजिटल पावतीवर सर्व कामे होतात, त्यामुळे पोलीस ठाण्यात जाण्याची आवश्यकता नसते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत