अनेकदा सामान्य नागरिकांना पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज कसा लिहावा याबद्दल योग्य माहिती नसते. या लेखात आपण Police Station FIR Application सोपा मराठी फॉरमॅट आणि अर्ज लिहिताना कोणती काळजी घ्यावी, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
कोणत्याही गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रथम खबर अहवाल (First Information Report – FIR) हा सर्वात महत्त्वाचा कायदेशीर टप्पा असतो. चोरी, घरफोडी, शारीरिक हल्ला, फसवणूक किंवा जबरदस्तीने चोरी (Robbery) यांसारख्या दखलपात्र (Cognizable) गुन्ह्यांच्या बाबतीत पोलिसांत लेखी अर्ज देणे आवश्यक असते.
दखलपात्र गुन्हा म्हणजे काय?
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (CRPC / BNSS) नुसार, ज्या गुन्ह्यांमध्ये पोलीस वॉरंटशिवाय आरोपीला अटक करू शकतात आणि त्वरित तपास सुरू करू शकतात, अशा गुन्ह्यांना दखलपात्र गुन्हा (Cognizable Offence) म्हणतात.
दखलपात्र गुन्ह्यांची उदाहरणे:
- घरफोडी आणि चोरी
- शारीरिक हल्ला किंवा मारहाण
- आर्थिक फसवणूक (Fraud)
- जबरदस्तीने दागिने किंवा मोबाईल हिसकावणे (Robbery)
- गंभीर धमकी किंवा सायबर गुन्हे
खालील Police Station FIR Application फॉरमॅटनुसार तुम्ही पांढऱ्या कागदावर स्पष्ट अक्षरात अर्ज लिहू शकता:
Police Station FIR Application Format
प्रति,
माननीय पोलीस निरीक्षक साहेब,
[Shirpur पेठ पोलीस स्टेशन]
[Shirpur, Dist Peth]
विषय: माझा घरातून सायकल चोरी / मोबाईल चोरी / मारहाण बाबत कायदेशीर कारवाई होणेबाबत एफआयआर अर्ज.
तक्रारदाराची माहिती:
- पूर्ण नाव: [शैलेश एल पावरा]
- वय: [29]
- पत्ता: [New Boradi Tal SHirpru]
- मोबाईल नंबर: [78451295623]
महोदय,
मी खालील सही करणार [Shailesh L Pawara], राहणारा [New Boradi Tal shirpru], हे निवेदन सादर करतो की,
दिनांक [12/08/2026] रोजी वेळ सुमारे [4:35] वाजता sakali [New Boardi गावात] येथे ही घटना घडली.
घटनेचा संक्षिप्त तपशील:
मी new Boradi या गावात राहत असून माझ्या घरासमोर गाडी पार्क केली होती. रात्री 4:35 ते सकाळी 5 च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने ती चोरी केली. चोरी करणाऱ्या व्यक्तीस मी पहिले परंतु त्याने मास्क लावल्याने काही कळले नाही तरी , मी चोर चोर असे आरडा ओरड केली तर अमुक व्यक्तीने मला विनाकारण शिवीगाळ करून मारहाण केली.
संशयित / आरोपीची माहिती (माहित असल्यास):
[चोर अज्ञात व्यक्ती असल्याने]
पुराव्यांची माहिती (असल्यास):
[CCTV असल्यास फुटेज, फोटो, मेसेज किंवा साक्षीदारांची नावे]
तरी वरील सर्व बाबींचा विचार करून संबंधित चोर दोषी व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि माझी एफआयआर आपल्या पोलीस तठाण्यात (FIR) नोंदवून घ्यावी, ही नम्र विनंती.
सोबत जोडलेली माझे कागदपत्रे:
१. माझे आधार कार्ड / ओळखपत्र छायाप्रत
२. [घराचा उतारा, आणि लाईट बिल]
आपला/आपली नम्र,
(तक्रारदाराची स्वाक्षरी)
[शैलेश एल पावरा]
दिनांक: [13/0/2026]
ठिकाण: [Shirpur Police Thane]
Police Station FIR Application, अर्ज लिहिताना घ्यावयाची काळजी
- १. वेळ आणि तारीख: घटनेची तारीख, वेळ आणि ठिकाण स्पष्टपणे नमूद करा.
- २. वस्तुस्थिती: अर्जात चुकीची माहिती किंवा फुगवून सांगितलेल्या गोष्टी लिहू नका.
- ३. पावती (Acknowledgement): अर्ज पोलीस ठाण्यात जमा केल्यानंतर त्याची Stamped Receipt (पोच पावती) नक्की घ्या.
- ४. झेरॉक्स प्रत: अर्जाची एक प्रत नेहमी स्वतःकडे सुरक्षित ठेवा.
Police Station FIR Application Format PDF
Related Post : Police complaint Format in Marathi, तक्रार अर्ज पोलीस स्टेशन
सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
प्रश्न १: Police Station FIR नोंदवून घेण्यास नकार देऊ शकतात का?
उत्तर: दखलपात्र गुन्ह्यासाठी Police Station FIR नोंदवण्यास नकार देऊ शकत नाहीत. जर पोलिसांनी नकार दिला तर तुम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी (DCP/SP) यांच्याकडे किंवा न्यायालयाच्या माध्यमातून तक्रार नोंदवू शकता.
प्रश्न २: Police Station FIR नोंदवण्यासाठी पैसे द्यावे लागतात का?
उत्तर: नाही. Police Station FIR नोंदवणे पूर्णपणे मोफत असते. एफआयआरची एक प्रत तक्रारदाराला मोफत मिळणे हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे.
प्रश्न ३: Police Station FIR Application हस्तलिखित असावा की टाईप केलेला?
उत्तर: तुम्ही Police Station FIR Application कागदावर हाताने लिहिलेला किंवा कॉम्प्युटरवर टाईप केलेला असा कोणताही अर्ज सादर करू शकता.
प्रश्न ४: झिरो एफआयआर (Zero FIR) म्हणजे काय आणि तो कधी दाखल केला जातो?
उत्तर: गुन्हा ज्या भागात घडला आहे, तिथल्याच पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करणे आवश्यक नसते. जर एखादी आपत्कालीन परिस्थिती असेल, तर नागरिक कोणत्याही जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवू शकतात. अशा वेळी पोलीस क्षेत्राची मर्यादा न पाहता ‘झिरो एफआयआर’ नोंदवतात आणि नंतर तो अर्ज संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग (Transfer) केला जातो.
प्रश्न ५: Police Station FIR आणि Police Station NC यामध्ये काय फरक आहे?
उत्तर:
- एफआयआर (Police Station FIR): चोरी, घरफोडी, शारीरिक हल्ला यांसारख्या दखलपात्र (Cognizable) गंभीर गुन्ह्यांसाठी नोंदवला जातो. यामध्ये पोलिसांना वॉरंटशिवाय आरोपीला अटक करण्याचे आणि तपास करण्याचे थेट अधिकार असतात.
- एनसी (Police Station NC): किरकोळ भांडणे, शिवीगाळ किंवा अदखलपात्र गुन्ह्यांसाठी नोंदवली जाते. यामध्ये पोलिसांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय थेट तपास करता येत नाही.
प्रश्न ६: Police Station FIR Application नोंदवून घेण्यास नकार दिल्यास काय करावे?
उत्तर: जर स्थानिक Police Station FIR Application नोंदवत नसतील, तर तुम्ही खालील कायदेशीर पावले उचलू शकता:
- १. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार: पोलीस अधीक्षक (SP) किंवा पोलीस आयुक्त (CP) यांच्याकडे लेखी स्वरूपात नोंदणीकृत पोस्टाने (Speed Post) तक्रार पाठवू शकता.
- २. न्यायालयात दाद: तरीही कारवाई न झाल्यास, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १७५(३) [पूर्वीचे CrPC 156(3)] नुसार स्थानिक प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे (JMFC Court) तक्रार अर्ज दाखल करू शकता.
प्रश्न ७: मोबाईल किंवा कागदपत्रे गहाळ/चोरी झाल्यास Police Station FIR Application आवश्यक असतो का?
उत्तर: मोबाईल किंवा ओळखपत्रे (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड) गहाळ (Lost) झाल्यास सामान्यतः पोलीस ‘गहाळ नोंद’ (Missing Complaint/NC) देतात. परंतु, जर तुमचा मोबाईल किंवा पाकीट जबरदस्तीने हिसकावून घेतले (Robbery) किंवा चोरी झाले असेल, तर त्यासाठी Police Station FIR Application नोंदवणे आवश्यक असते.
प्रश्न ८: ऑनलाईन एफआयआर (Police Station e-FIR) दाखल करता येतो का?
उत्तर: होय, महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत पोर्टलवर (महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल) ई-तक्रार नोंदवण्याची सोय उपलब्ध आहे. विशेषतः वाहन चोरी, मोबाईल चोरी किंवा अज्ञात व्यक्तीविरुद्धच्या किरकोळ गुन्ह्यांसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. मात्र, गंभीर किंवा शारीरिक हल्ल्याच्या प्रकरणात पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य असते.
प्रश्न ९: Police Station FIR नोंदवल्यानंतर त्याची प्रत मिळण्यासाठी किती वेळ लागतो?
उत्तर: कायदेशीर नियमांनुसार, Police Station FIR नोंदवल्यानंतर लगेचच त्याची स्वाक्षरी केलेली प्रत (Certified Copy) तक्रारदाराला मोफत मिळणे हा त्याचा अधिकार आहे. यासाठी कोणताही विलंब किंवा शुल्क आकारले जात नाही.