अनेकदा पोलीस ठाण्यात गेल्यावर “लेखी (NC Application) अर्ज लिहून द्या” असे सांगितले जाते. परंतु पोलीस ठाण्यात NC Application Format Marathi अर्ज कसा लिहावा? याबद्दल योग्य माहिती नसल्याने नागरिक गोंधळतात. या लेखात NC म्हणजे काय, ती कधी नोंदवली जाते आणि अर्जाचा परिपूर्ण मराठी मसुदा (Draft) दिला आहे.
पोलीस ठाण्यात NC Application Format Marathi अर्ज कसा लिहावा?
दररोजच्या आयुष्यात शेजाऱ्यांशी झालेली खटपट, जागेवरून वाद, किरकोळ शिवीगाळ, धमक्या किंवा सिम कार्ड/ओळखपत्र हरवणे अशा घटना घडतात. अशा वेळी पोलीस ठाण्यात NC (Non-Cognizable Offense – बिगर-दखलपात्र गुन्हा) नोंदवला जातो.
NC Application (बिगर-दखलपात्र गुन्हा) म्हणजे काय?
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत गुन्ह्यांचे दोन प्रकार असतात: दखलपात्र (Cognizable) आणि बिगर-दखलपात्र (Non-Cognizable).
- बिगर-दखलपात्र गुन्हा (NC): ज्या गुन्ह्यांमध्ये पोलीस न्यायालयाच्या परवानगीशिवाय थेट अटक करू शकत नाहीत किंवा थेट तपास सुरू करत नाहीत, त्यांना NC म्हटले जाते.
- कधी नोंदवली जाते?
- किरकोळ वाद, शिवीगाळ आणि किरकोळ धमक्या.
- मालमत्ता किंवा जागेवरून होणारे छोटे वाद.
- सिम कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड हरवल्यास (Loss Intimation Report).
पोलीस ठाण्यात NC अर्ज कसा लिहावा? (NC Application Format )
खाली दिलेला NC Application Format अर्ज तुम्ही कागदावर हाताने लिहून किंवा प्रिंट काढून पोलीस ठाण्यात सादर करू शकता:
दिनांक: DD/MM/YYYY
स्थळ: [New Boradi Tal. Shirpur]
प्रति,
मा. पोलीस निरीक्षक साहेब,
[Shirpur मध्यवर्ती पोलीस ठाणे],
[Shirpur Dist Dhule].
विषय: गैरवर्तन, शिवीगाळ आणि धमक्या देणाऱ्यांविरुद्ध बिगर-दखलपात्र तक्रार (NC) नोंदवणेबाबत.
अर्जदार:
[Shailesh Lalsing Pawara]
वय: [29], व्यवसाय: [Sheti]
पत्ता: [New Boradi Post Boradi Tal. shirpur Dist. Dhule]
मोबाईल क्र.: [7845126523]
महोदय,
मी खालीलप्रमाणे तक्रार नोंदवत आहे की, [20/08/2026] रोजी सुमारे [4:50] वाजता [New Boradi] येथे मी उपस्थित असताना [RS Se Pawra हे New Boradi Post Boradi Tal. shirpur Dist. Dhule] यांनी माझ्याशी विनाकारण वाद घातला.
सदर वादादरम्यान त्यांनी मला आई, बहिण वरून अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि भविष्यात दुष्परिणाम भोगावयाची धमकी दिली. या घटनेमुळे सद्या मला माझ्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून मानसिक त्रास झाला आहे.
तरी कृपया सदर घटनेची नोंद मी शिरपूर आपल्या पोलीस ठाण्यातील बिगर-दखलपात्र नोंदवहीत (NC Register) घेण्यात यावी आणि संबंधित व्यक्तीला योग्य ती ताकीद देण्यात यावी, अशी लेखी देऊन आपणास विनंती करीत आहे.
- आपला/आपली नम्र,
- (सही)
- शैलेश लालसिंग पावरा पत्ता: [New Boradi Post Boradi Tal. shirpur Dist. Dhule]
हरवलेल्या वस्तू/ओळखपत्रासाठी (NC Application Format) अर्ज
जर चालू सिम कार्ड, आधार कार्ड किंवा लायसन्स हरवले असेल तर NC Application Format अर्जाचा विषय खालीलप्रमाणे ठेवावा:
विषय: हरवलेले [आधार कार्ड / सिम कार्ड / ओळखपत्र] बाबत नोंद (Loss Intimation) मिळणेबाबत.
अर्जामध्ये चालू सिम कार्ड कधी व कोठे हरवले, आधार कार्ड, मतदान कार्डचा क्रमांक (उपलब्ध असल्यास) आणि मोबाईल नंबर सह लेखी अर्जात नमूद करावा. पोलीस ठाण्यात या अर्जावर शिक्का व सही देऊन Loss Intimation Receipt देतात, ज्याचा वापर आता नवीन कार्ड काढण्यासाठी होतो.
हे देखील वाचा : हरवलेले [आधार कार्ड / सिम कार्ड / ओळखपत्र] बाबत नोंद तक्रार अर्ज पोलीस स्टेशन
NC नोंदवताना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी
- दोन प्रती (Copies) तयार ठेवा: अर्जाच्या दोन प्रती सोबत घेऊन जा. एका प्रतवर पोलीस ठाण्याचा आवक (Inward) शिक्का, तारीख आणि सही अवश्य घ्या.
- NC पावती सुरक्षित ठेवा: पोलिसांकडून मिळणारी NC पावती (NC Stamp Copy) भविष्यातील कायदेशीर पुराव्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते.
- कायदेशीर कारवाई: NC नंतर पोलीस थेट अटक करत नाहीत. परंतु, वाद वाढल्यास न्यायालयीन आदेशानुसार पोलीस पुढील कारवाई करू शकतात.
NC Application Format PDF
सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Q1. NC नोंदवण्यासाठी काही शुल्क (Fees) द्यावे लागते का?
उत्तर: नाही, पोलीस ठाण्यात NC नोंदवणे पूर्णपणे मोफत असते.
Q2. NC मुळे सरकारी नोकरी किंवा व्हिसावर परिणाम होतो का?
उत्तर: नाही. NC ही केवळ माहिती नोंद (Information Report) असते, तो दाखल झालेला गंभीर गुन्हा (FIR) नसतो. त्यामुळे याचा नोकरीवर किंवा पासपोर्टवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
Q3. NC आणि FIR मध्ये काय फरक आहे?
उत्तर: FIR गंभीर (दखलपात्र) गुन्ह्यांसाठी असते जिथे पोलीस तात्काळ कारवाई व अटक करू शकतात. NC ही किरकोळ गुन्ह्यांसाठी किंवा माहिती नोंदीसाठी असते.
लेखकाविषयी:
अॅड. शैलेश पावरा (कायदेशीर सल्लागार व विधी तज्ज्ञ)
लेखक मागील आता 1 वर्षांपासून नागरी कायदा, पोलीस प्रक्रिया आणि कायदेशीर जनजागृती विषयांवर लेखन करत आहेत. नागरिकांना त्यांच्या हक्कांची आणि कायद्याची सोप्या भाषेत माहिती देणे हा या लेखाचा मुख्य उद्देश आहे.